Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये मानधन द्या - आम आदमी पक्षाची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - या महागाई च्या काळामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून फक्त एक हजार...
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
या महागाई च्या काळामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून फक्त एक हजार रुपयाची तटपुंजी रक्कम मिळते ही रक्कम परवडण्यासारखी नसुन लगतच्या तेलंगणा आणि दिल्ली सरकारच्या धर्तीवर तीन हजार रुपये तिथलं सरकार देते. दिल्ली पेक्षा चार पटीने जास्त कर महाराष्ट्र शासनाकडुन सरकारला दिला जातो. तर अडचण काय असा प्रश्न उपस्थित करत संजय गांधी निराधार योजनेचे विधवा, घटस्फ़ोटीत महिला, अंध, अपंग, मुखबधीर, दुर्जर आजाराने ग्रस्त लोकांना तसेच, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थीना दरमहिना 3000/- (तीन हजार रुपये) मासिक वेतन देण्यात यावे. श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांच्या वयाची अट 60 वर्ष करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 51 हजार करण्यात यावे. या मागणीला घेऊन आम आदमी पार्टी राजुरा च्या वतीने तालुकाध्यक्ष रोशन येवले यांच्या नेतृत्वात जेष्ठ नेते मिलिंद गडमवार, राजुरा विधानसभाध्यक्ष प्रदीप बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, बल्लारपूर शहरअध्यक्ष रवीकुमार पुसलवार, कोषाध्यक्ष आशीफभाई शेख, यांच्या प्रमुख उपस्थित राजुरा तहसिल कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी आघाडी प्रमुख स्वप्निल कोहपरे, संघटनमंत्री पवन ताकसांडे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष अरविंद वांढरे, महादेव चापले, उपाध्यक्ष विलास निमलवार, मधुकर हजारे, चांद खान, सुरेश लोखंडे, श्रीवेनी दावा, ताहॆरा बेगम, सबा बेगम, तानेबाई लोखंडे, सखुबाई रामटेके, रजा बेगम, बानु दावा, शकुंतला मेंगरे, रीता झाडे, शोभा मेंगरे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top