Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने तालुक्यातील ग्रा.पं. अंतर्गत कापलेली स्ट्रिटलाईटची पुन्हा जोडणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराज कोहळे - आमचा विदर्भ प्रतिनिधी सावली - सावली तालुक्यातील दोन दिवसा अगोदर ग्राप अंतर्गत स्ट्रिटलाईट बिल न भरल्यामुळे कापली गेली होती. भा...
धनराज कोहळे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
सावली तालुक्यातील दोन दिवसा अगोदर ग्राप अंतर्गत स्ट्रिटलाईट बिल न भरल्यामुळे कापली गेली होती. भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.27/08/2021 ला सावली येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत आमदार व माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्यात आले .असुन सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सावली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चे स्ट्रिटलाईटची जोडणी करण्यात येत आहे. मानीय आमदार व माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सावली तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top