Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना तालुक्यातील अनेक रस्त्यावर अंतर व दिशादर्शक फलकच नाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - तालुक्यातील अनेक प्रमुख व ग्रामीण रस्त्यावर अंतर व दिशादर्शक फलक नसल्याने वाहतूकदारांना अडचणी...
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
तालुक्यातील अनेक प्रमुख व ग्रामीण रस्त्यावर अंतर व दिशादर्शक फलक नसल्याने वाहतूकदारांना अडचणीचे ठरत आहे. मात्र हे फलक लावण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचांदुर ते राज्य सीमा, भोयगाव ते गडचांदूर, कन्हालगाव ते मांडवा, येरगव्हाण ते हातलोणी दरम्यान गडचांदुर वगळता एकाही गावाचे गाव स्थानकावर गाव नाम फलक नाही. तसेच भोयगाव - कवठाला मार्गावरील बोढे होमिओपॅथी किलीनिक जवळील टी पॉइंट, वनसडी - भोयगाव मार्गावरील इरई चौपाटी, दालमिया सिमेंट चौपाटी, बोरी नवेगाव फाटा, वनसडी जवळील नारंडा फाटा, कोरपना - वणी मार्गावरील तुकडोजीनगर टी पॉइंट, कोडशी बू मार्गावरील गांधीनगर फाटा, परसोडा मार्गावरील रायपुर फाटा, आदिलाबाद मार्गावरील दुर्गाडी फाटा, टांगला फाटा ते रुपापेठ मार्गावरील जांभूळधरा फाटा, मांगलहिरा चौपाटी, थिपा हनुमानगुडा टी पॉइंट, कोरपना बस स्थानक परिसर, कातलाबोडी - कोरपना मार्गावरील हातलोणी व बोरगाव फाटा, वनसडी ते कारगाव मार्गावरील पिपरडा फाटा या स्थानी दिशादर्शक व अंतर फलक नाही. परिणामी नवीन व्यक्तींना त्या स्थानी कोणता मार्ग कुठे जातो या बद्दल माहिती मिळत नाही. यात त्याला मनस्ताप सहन करावा लागतो आहे. राज्य व जिल्हा सीमेवर ही सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे सीमा कुठून सुरू होते. हे सुध्दा कळायला मार्ग नाही. या अनुषंगाने बांधकाम विभागाने फलके लावावी अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून होते आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top