Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिवसेना ने केला नारायण राणे यांचा निषेध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विरोध मोर्चा चे आयोजन  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - आज दि. ...
  • गडचांदूर शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विरोध मोर्चा चे आयोजन 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आज दि. 24ऑगस्ट 2021 रोज मंगळवार ला गडचांदूर शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला आघाडीच्या  वतीने  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदूर येथे निषेध व निदर्शने करण्यात आले. यावेळी गडचांदूर नगरपरिषद चे गटनेते तथा तालुका प्रमुख सागर ठाकूरवार, नगरसेवक तथा उपतालुका प्रमुख शेख सरवरभाई, नगर परिषद महिला व बालकल्याण उपसभापती सौ वैशालीताई गोरे, नगर सेविका सौ किरणताई अहिरकर, नगर सेविका सौ सुनीताताई कोडापे, तालुका समन्व्यक इर्शादभाई कादरी, शहरप्रमुख अक्षय गोरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रणित अहिरकर, युवासेना शहर समन्व्यक यश ठाकूरवार, रजत ठाकुरवार, सागर टोंगे, करण दुबे, रोहित दुराटकर, राजेश भोयर, अमरदीप हिरादेवे, संजय हिवरे, कैलाश कुइटे, दर्शन कोडापे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top