Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा तालुक्यात बबनभाऊ चा झंझावात.....
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बोडखा व साखरवाही येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे य...
  • बोडखा व साखरवाही येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश
  • जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात तालुक्यात युवा कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरूच
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात शिवसंपर्क अभियान जोमाने सुरु आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात  राजुरा तालुक्यात शिवसेना युवकांची पहिली पसंती बनत आहे. राजुरा तालुक्यातील साखरी, अहेरी नंतर आता बोडखा व साखरवाही येथे झालेल्या संपर्क अभियानात शेकडो युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्या सर्व युवकांचे शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी शिवबंधन बांधून व गळ्यात भगवा दुपट्टा टाकून प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागत केले.
शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये गणेश परसुटकर, निखिल बोरकुटे, रविंद्र लोहे, सुरज ढेंगरे, विनोद ढेंगरे, मनोज आगलावे, प्रमोद डवरे, सचिन बोरकुटे, संदिप आत्राम, स्वप्निल परसुटकर, स्वप्निल बोरकुटे, अनिल बोरकुटे, रितेश वैरागडे, अरविंद बोरकुटे, मोहन जगताप सोबतच शेकडो कार्यकर्ते शिवबंधनात बंधले. याप्रसंगी युवासेनेचे तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवासेना उपतालुका प्रमुख गणेश चोथले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यात गावोगावी शिवसेना आपले पाळेमुले मजबूत करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top