Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा-गडचांदूर मार्गावर हरदोना जवळ बैलगाडीला पिकअपची जबर धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकरी जागीच ठार, दोन्ही बैल गंभीर जखमी राजुरा शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांची घटनास्थळी भेट आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा...
  • शेतकरी जागीच ठार, दोन्ही बैल गंभीर जखमी
  • राजुरा शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांची घटनास्थळी भेट
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शेतातून कामे आटोपून गावाकडे जात असलेल्या एका शेतकऱ्याच्या बैलगाडीला भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक MH32 AJ5917 ने जोरदार धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राजुरा-गडचांदूर मार्गावर हरदोना गावाजवळ सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. 
हरदोना येथील शेतकरी बीरशाव जलपती सिडाम वय 55 हे शेतकरी शेतीचे काम आटपवून आपल्या बैलगाडीने घरी परत जात असतांना भरधाव वेगाने अशोक लैलँड पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. यात शेतकरी बीरशाव सिडाम जागीच यांचा मृत्यू जागीच झाला तर दोन्ही बैल गंभीर जखमी झाले असून ते वाहतीच्या कामात येणार नाही. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण नुकसान वाहन मालकांने करून दिल्याशिवाय बॉडीला हात लावू देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांची घेतली. घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत मोठा जमाव झाला होता आणि वातावरण तापले होते. गावकऱ्यांनी राजुरा शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांना सुद्धा झालेल्या घटनेची माहिती देत घटनास्थळी येण्याची विनंती केली. बबन उरकुडे यांनी घटनास्थळी पोहचून जमवाला शांत करत मृतकाच्या कुटुंबियांना जोपर्यंत मदत मिळवून देणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका घेत वाहन मालकाला फोन करून त्यांचेकडून पूर्ण मदत देण्याचे आश्वासन घेतले. 
या घटनेमुळे घरचा कमवणारा एकमेव धनी गेल्याने शेतकऱ्याच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृतकाच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top