Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नांदाफाटा लसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लसीचे डोस वाढवण्याची गरज धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - नांदाफाटा औद्योगिक परिसरात लोकसंख्येच्या अनुपातात लसीकरण कमी झा...
  • लसीचे डोस वाढवण्याची गरज
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नांदाफाटा औद्योगिक परिसरात लोकसंख्येच्या अनुपातात लसीकरण कमी झाले असल्याने तसेच ३० दिवस येथील लसीकरण केंद्र बंद होते त्यामुळे दिनांक १६ ऑगस्ट व १८ ऑगस्ट रोजी लसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी होती जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने येथील लसीकरण केंद्रावर जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्याची मागणी  जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी केले आहेत. 
नांदा-बीबी-आवारपुर ही गावे औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने या तिन्ही गावची लोकसंख्या जवळपास ३५ हजारचेवर आहे याठिकाणी लोकसंख्येच्या अनुपात नागरिकांचे लसीकरण झालेले नाहीत तसेच नांदाफाटा येथील लसीकरण केंद्रांवर तीस दिवस उपलब्ध नव्हती त्यामुळे येथील लसीकरण केंद्रावर  नागरिकांची तोबा गर्दी असते स्थानिक प्रशासनाला गर्दी नियंत्रण करण्यास फार अडचणी होतात लसीकरण करणार्‍या आरोग्य विभागाच्या चमूवरही मोठा ताण असतो येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहता येथील लसीकरण केंद्रावर नियमित लस उपलब्ध करून जास्तीचे डोस देण्यात यावे अशी मागणी येथील जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी जिल्हा परिषदेकडे केले आहेत. कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनीही येथील लसीकरण केंद्रावर नियमितलसीचा पुरवठा करून आगाऊ लस उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर उचित माहिती सादर करुन पाठपुरावा करण्याची गरज आहेजेणेकरून येथील गर्दी टाळून नागरिकांचे लसीकरण करणे सोयीचे होईल. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top