Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नांदा येथे लसीकरणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - औद्योगिक नगरी नांदा येथे ३२२ नागरिकांचे लसीकरण पार पडले. लसीकरणाकरिता महिलांची लक्षणीय उ...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
औद्योगिक नगरी नांदा येथे ३२२ नागरिकांचे लसीकरण पार पडले. लसीकरणाकरिता महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. नांदा ग्रामपंचायतीकडून सांस्कृतिक हॉलमध्ये लसीकरणाकरीता आलेल्या सर्व नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. भवनाचे बाजुला अंबुजा फाऊंडेशनकडून पडदा लावून ५० नागरिक बसतील अशी सुव्यवस्था करून देण्यात आली. नांदा येथील लसीकरणाबाबत वृत्तपत्रांतून येथील समस्या बाबत सातत्याने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. आज लसीकरणाचे ठिकाणी नायब तहसीलदार यांनी भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे, सौ. वीणाताई मालेकर यांनीही लसीकरण केंद्राला भेट देत येथील समस्या जाणून घेऊन आरोग्य विभागाला सुचना दिल्या. आजचे लसीकरण उत्साहीत वातावरणात व्यवस्थितपणे पार पडले असून ३२२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले लसीकरणा करिता महिलांची लक्षणीय   उपस्थिती होती १८० महिलांना आज लसीकरण करण्यात आले  आरोग्य विभागाच्या चमूने उत्कृष्ट कार्य केले असून नांदा ग्रामपंचायतीचे कर्मचारी व आशावर्कर यांनीही आजचे लसीकरणात मोलाचे सहकार्य, नागरिकांनीही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधला. नांदा येथे नियमित लसीचा पुरवठा करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे यांनी आरोग्य विभागाला केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top