- खोटे प्रदुषण आकडे दाखवून सरकारची व जनतेची फसवणूक करण्याचे आरोप
गडचांदूर -
तत्कालीन सरपंच व आताच्या नगराध्यक्ष यांचे कार्यालयीन इमारतीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ प्रादेशीक कार्यालय, चंद्रपूर तर्फे प्रदूषणाची आकडेवारी गोळा करण्याकरिता 'Automatic Pollution Data Recorder' ही मशीन लावण्यात आली आहे. कागदोपत्री कमी प्रदुषण दाखवुन सरकारची दिशाभूल व जनतेची फसवणूक होत असल्यामुळे सदर मशीन MPCB ला वापस करण्याची मागणी काँग्रेस गटनेता विक्रम येरणे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
सदर मशिनात काही विशिष्ट प्रकारची पेपर टाकून मशीन 8-10 तास सुरू ठेऊन तो पेपर चंद्रपूर मधील प्रयोगशाळेत पाठवून प्रदुषणाची आकडेवारी काढणे अपेक्षीत आहे. पेपर टाकने व काढून चंद्रपूर येथे पोहचविण्याकरीता MPCS तर्फे एक एजंसी नेमण्यात आलेली आहे, परंतु सदर एजन्सीचा कोणताच व्यक्ती गेल्या 6-7 वर्षापासून येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मशीन शुरू असल्यास मशीनचा विशीष्ट आवाज येतो परंतु त्या आवाजाचे कुणीही आम्हाला कधी सांगतले नाही. सदर मशीन ही उपयोगात आणली जात नसून या मशीनची कागदोपत्री आकडेवारी MPCB कार्यालयात सादर केली जात नसून बोगस आकडेवारी मुळे गडचांदूर येथील वाढलेले प्रदुषण शासनाच्या दरबारी नोंदविले जात नाही. कागदोपत्री कमी प्रदुषण दाखवून सरकारची दिशाभूल व जनतेची फसवणूक करण्यात येत असल्यामुळे सदर मशीन MPEB कार्यालयास परत करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.