Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल ऊरकुडे यांच्यातर्फे कॅन्सरग्रस्ताला आर्थिक मदत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा तालुक्यातील मौजा भेंडवी येथील कॅन्सरग्रस्त विनेश शामराव चिंतापुरी यांच्या तबेतीची माहिती भाजप...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा भेंडवी येथील कॅन्सरग्रस्त विनेश शामराव चिंतापुरी यांच्या तबेतीची माहिती भाजपा कार्यकर्ते वामन तुरानकर यांचेकडुन मिळताच त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. सदर युवकाच्या घरची परिस्थिती खुप हलाकीची असुन घरात कमविणारे कोणीही नाही अश्या परिस्थितीत त्यांना आरोग्य योजनेतुन उपचार मिळविण्यासाठी योग्य माहिती दिली. एखादे संकट आल्यानंतर माणुस पूर्णपणे खचून जातो त्यावेळी माणसाला कोणचातरी आधार हवा असतो तेच यावेळी सुनिलभाऊने त्यांच्या कुटुबियांना व त्या व्यक्तीला आधार दिला व आर्थिक मदत देऊ केली. 
याप्रसंगी नोकारीचे वामन तुराणकर, शंकर नन्नावरे, विनोद बेगलिवार, संतोष सलाम, अंकुल सलाम, सुनिल आञाम, शामराव चिंतापुरी, संतोष मारोती रेषेन, प्रविण कामीला ऊपस्थित होते. कुटुंबीयांची सुनील उरकुडे यांचे आभार मानले. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top