Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोठारी गावातुन जाणारा राष्‍ट्रीय महामार्गाचा भाग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा – आ. सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. मुनगंटीवार यांनी ग्रामस्‍थांसह केला पाहणी दौरा शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी या गावातुन जाण...
  • आ. मुनगंटीवार यांनी ग्रामस्‍थांसह केला पाहणी दौरा
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी या गावातुन जाणाऱ्या राष्‍ट्रीय महामार्गाशी संबंधित नागरिकांच्‍या मागण्‍यांच्‍या अनुषंगाने त्‍वरीत कार्यवाही करण्‍याचे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. कोठारी गावातुन जाणारा राष्‍ट्रीय महामार्गाचा हा भाग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
दिनांक २६ ऑगस्‍ट २०२१ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राष्‍ट्रीय महामार्ग विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. जयस्‍वाल, कार्यकारी अभियंता श्री. मिश्रा, उपकार्यकारी अभियंता श्री. बोबडे यांच्‍यासोबत या विषयासंदर्भात पाहणी दौरा केला. यावेळी नागरिकांच्‍या मागण्‍यांच्‍या अनुषंगाने दोन्‍ही कडून रस्‍त्‍याची रूंदी कमी झाली आहे ती वाढवत झाडे लावण्‍यासाठी जागा ठेवावी असे निर्देश दिले. रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला शेवटपर्यंत सिमेंट नाली असावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. याबाबत त्‍वरीत अंदाजपत्रक तयार करण्‍याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. रस्‍ता दुभाजकाच्‍या मधल्‍या भागात पथदिवे लावावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली. याबाबत त्‍वरीत कार्यवाही करण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. नाल्‍यापासून तलावापर्यंत रस्‍ता दुभाजक, पथदिवे व नाली बांधकाम करण्‍याची मागणी गावकऱ्यांनी केली. याबाबत सुध्‍दा त्‍वरीत अंदाजपत्रक तयार करण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. स्‍पीड ब्रेकर डांबरापासून तयार करण्‍याबाबत आ. मुनगंटीवार यांनी विभागाला निर्देश दिले. विभागानी सुध्‍दा त्‍वरीत कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन दिले. या पाहणी दौऱ्यादरम्‍यान जिल्‍हा परिषद सदस्‍या वैशाली बुध्‍दलवार, बल्‍लारपूर पं.स. सभापती इंदिरा पिपरे, उपसभापती सोमेश्‍वर पदमगिरीवार, सरपंच मोरेश्‍वर लोहे, उपसरपंच सावित्रा मोहुर्ले, ग्रा.पं. सदस्‍य स्‍नेहल टिंबडिया, संजय सिडाम, तालुका सरचिटणीस रमेश पिपरे, विलास राजुरकर, अमोल कातकर, सर्व ग्राम पंचायत सदस्‍य व गावातील प्रतिष्‍ठीत नागरिकांची उपस्थिती होती. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top