Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यात बुथ बंच व मतदार यादी देऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियानाला सुरुवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर, बाखर्डी, नांदा, माथा व इतर ठिकाणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी संपन्न धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदू...
  • गडचांदूर, बाखर्डी, नांदा, माथा व इतर ठिकाणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील सहा पंचायात समिती व दोन शहरातील विस्तारक व शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख यांना मतदार याद्या व बुथ बंच देऊन बुथ प्रमुख, बुथ समिती, पेज प्रमुखांचे नियोजन करा अशी विनंती भाजपा कोरपना तालुका अध्यक्ष तथा संयोजक नारायण हिवरकर यांनी केली. गडचांदूर, बाखर्डी, नांदा, माथा तसेच इतर ठिकाणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या बैठकीत शहराध्यक्ष तथा बुथ विस्तारक राजुरा विधानसभा सतीश उपलंचीवार, बुथ विस्तारक संजय मुसळे, युवा मोर्चा जिल्हा सचिव ओम पवार, पंचायत समिती सदस्य नूतन कुमार जीवने, विस्तारक पं समीती कोडसी (बू) शशिकांत अडकिने, विस्तारक अशोक झाडे, शक्ती केंद्रप्रमुख उपरवाही निखील भोंगळे आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top