Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आशावर्कर वर जीवघेण्या हल्याचा निषेध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन गडचांदुर पोलिस स्टेशनला व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यां...
  • जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन
  • गडचांदुर पोलिस स्टेशनला व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनाही दिले निवेदन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नोकारी खुर्द येथील आशा वर्कर संगीता जयप्रकाश ठाकरे या आपल्या गावात कोरोना सर्वेक्षण व इतर शासकीय काम करीत असताना ६ ऑगस्ट रोजी गावातील एका गाव गुंडाने तिला शिवीगाळ करत जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी व गुन्हेगाराला कठोर शिक्षा तातडीने झाली पाहिजे यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांनी वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांनी ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी राजुरा, बल्लारपुर, चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातील तसेच सर्व शहरी आशा वर्कर जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपस्थित झाल्या. कोरपना तालुक्यातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी गडचांदुर येथील पोलिस स्टेशनला व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन दिले. उर्वरित तालुक्यात सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी आपापल्या तालुक्यात पोलिस स्टेशनला निवेदन दिले. विनोद  झोडगे  जिल्हा अध्यक्ष आशा वर्कर, गट प्रवर्तक संघटना संलग्न आयटक चंद्रपुर यानी या उपक्रमाचे नेतृत्व केले. 













About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top