Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गणमान्य व्यक्ती व युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील विविध परिसरातील युवक आणि शहरातील गणामान्य व्यक्तीनी शासकीय विश्राम गृह येथे झा...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर शहरातील विविध परिसरातील युवक आणि शहरातील गणामान्य व्यक्तीनी शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या छोटेखानी बैठकीत शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या नेतृत्वात प्रवेश घेतला. 
या कार्यक्रमात प्रभाग अध्यक्ष व काही वॉर्डातील वॉर्ड अध्यक्ष यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली. या प्रवेश आणि नियुक्ती कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, शहर उपाध्यक्ष निसार शेख, शहर महासचिव संभाजी खेवले, धनंजय दानव, विद्यार्थी शहर अध्यक्ष राम इंगळे, शहर सचिव मुन्ना टेंबुरकर, युवक सचिव अभिनव देशपांडे, युवक उपाध्यक्ष राहुल देवतळे, प्रभाग अध्यक्ष जोगी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 
या बैठकीत अक्षय बनसोड यांच्या सोबत शहरातील स्वप्नील इटनकर, मनीष तायवाडे, संजय पाटोळे, प्रवीण तडस, दामोदर पाठक, ओम खंगार, रोहित शेरकी, पृथ्वी कुंभारे, प्रदीप राजपूत, सागर गडाई, प्रफुल रामटेके, सिद्धार्थ रामटेके, संजू विश्वास, प्रफुल लाटारे, विलास पेंदोर, विजय मदनकर, संदेश कौसरे, इमरान शेख, प्रदीप मेश्राम, प्रज्वल कांबळे यांनी प्रवेश घेतला व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याच्या उद्देशाने सदैव तत्पर असू असे आश्वासन शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड आणि विधानसभा अध्यक्ष सुनिल काळे ह्यांना दिले. संचालन व आभार विद्यार्थी शहर अध्यक्ष राम इंगळे यांनी केले.  












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top