Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जल जंगल जमीन चे खरे रखवालदार हे आदिवासीच - भारती पाल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जागतिक आदिवासी दिन निमित्य बामणवाडा येथे वृक्षारोपण आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजूरा - जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज राजूरा शहर...
  • जागतिक आदिवासी दिन निमित्य बामणवाडा येथे वृक्षारोपण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजूरा -
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज राजूरा शहरात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. स्थानिक बिरसा मुंडा चौक येथे राष्ट्रीय शहीद बिरसा मुंडा व क्रांतिकारक वीर शहीद बाबुराव शेडमाके ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष बापुराव मडावी, बामणवाडाचा सरपंच भारती पाल, वामन सिडाम, कविता मडावी, ग्राम सेवक दत्ता कवठाडकर, गट विकास अधिकारी अरुण मेश्राम, बिरसा मुंडा वार्ड चे जेष्ठ नागरिक प्रकाश मरसकोल्हे, लाइनमेन मेश्राम, देवानंद रांझीकर, योगेश कोडापे, नंदकिशोर कोडापे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ मधुकर कोटनाके, धीरज मेश्राम, बाळकृष्ण मसराम, रमेश आडे, संतोष कूलमेथे, वर्षा कोहचाडे, बबन मडावी, लक्ष्मण कुमरे व आदिवासी समाजाचे बांधवानी केले. 
आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न अडचणी अजूनही मार्गी लागलेले नाही त्यामुळे जगातील आदिवासी एक दिवसी एकत्र येऊन हा दिवस साजरा केला जातो. विविध वेषभूषा, बोली भाषा, संस्कृती असलेला समाज हा ह्या दिवशी एकत्र येऊन जागतिक मुल निवासी दिवस साजरा करतात. आदिवासी संस्कृती आधी पासून जल, जंगल, जमीन चे मालक आहेत, त्याचे रक्षण आदिवासी समाजाने केले आहे असे मत भारती पाल यांनी यावेळी व्यक्त केले. 
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत बामणवाडा च्या हद्दीतील खुल्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. ग्राम पंचायत सदस्य सर्वांनंद  वाघमारे, सुजाता मेश्राम, प्रफुल्ल चौधरी, भारती करमनकर, संमिश्रा झाडे, माजी सदस्य तुलाराम गेडाम, ग्राम पंचायत कर्मचारी प्रदीप पाल, मंगेश गेडाम, आकाश करमनकर यांनी झाडे लावून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. 
सर्व ग्रामपंचाय कर्मचारी व पदाधिकारी ह्याचे स्वागत व सत्कार डॉ. शुभम कुमरे, अभिलाष परचाके, सोनल मडावी, सुयोग मसराम, राणी मडावी ह्यांनी केले. संचालन घनश्याम मेश्राम तर उपस्थितांचे आभार संतोष कूलमेथे ह्यांनी मानले. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top