Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामविकासाठी प्रत्येक नागरिकांनी झटावे - भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवा नेते स्वप्नील वरारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा इरई (बोरगाव) येथे नागरिकांसोबत बैठक संपन्न धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी ग...
  • युवा नेते स्वप्नील वरारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
  • इरई (बोरगाव) येथे नागरिकांसोबत बैठक संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गावातील नागरीक हा प्रत्येक गावातील विकासाचा कणा असतो, आपल्या गावातील विकास साध्य करण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, शासनाची प्रत्येक योजना हे समाजातील अंतिम घटकांपर्यत पोहचली पाहिजे, प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हा आपल्या आपल्या नुसार आपले कर्तव्य बजावत असतो, परंतु आपल्या ग्रामविकासाकरिता आपल्या प्रत्येक नागरिकांनी झटले पाहिजे असे प्रतिपादन कोरपना तालुक्यातील इरई बोरगाव येथे गावातील नागरिकांशी संवाद साधताना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केले. यावेळी गावातील युवा नेते स्वप्नील वरारकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बंडू गेडाम, राजू वरारकर, मंगेश मोहूरले, स्वप्नील वरारकर, विजेता गेडाम, निखिल पिदूरकर  उपस्थिती होते.
यावेळी गावातील नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, जिल्हा परिषदेच्या योजना, गावातील विकासाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या भोयगाव ते गडचांदूर रस्त्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. 
तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, सरकारी रुग्णालय, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी येथे कोणत्याही प्रकारची अडचण नागरिकांना असल्यास आम्ही निश्चितच मदत करू असे आश्वासन यावेळी आशिष ताजने यांनी गावातील नागरिकांना दिले.
यावेळी बाळू तेलंग, शिवदास पायघन, ऋषी मांदाळे, सिद्धार्थ निखाडे, सचिन आत्राम, विशाल वरारकर, मोरेश्वर जेऊरकर, सुनील गेडाम, रामदास भोयर, अशोक बोबडे, प्रशांत वरारकर, विठ्ठल भोयर, महेश मांदाळे, विठ्ठल बोबडे उपस्थित होते. तसेच गावातील नागरिक व महिला वर्गाची उपस्थिती होती. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top