Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भारतीय जैन संघटना चंद्रपुर सिटी विंगच्या सदस्यांनी केले रक्तदान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - रक्तदान ही मानवतेची एक महान सेवा आहे कारण ती एका मानवाने दुसऱ्याला दिलेली अमूल्य भेट आहे. जिल्ह...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
रक्तदान ही मानवतेची एक महान सेवा आहे कारण ती एका मानवाने दुसऱ्याला दिलेली अमूल्य भेट आहे. जिल्ह्यातील होतकरू तरुण नियमितपणे रक्तदान करून मानवतेचे कर्तव्य बजावत आहेत. त्याच अनुषंगाने भारतीय जैन संघटना चंद्रपुर सिटी विंग यांचे कडून चंद्रपुरातील रक्तपेढीत रक्ताची कमतरता पाहता 29 ऑगस्ट रोजी खजांची भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 70 लोकांनी रक्तदान करत मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. यावेळी भारतीय जैन संघटना चंद्रपुर सिटी विंगचे देवेंद्र पारख, आनंद तालेरा, अमित खजांची, अनिकेत लुनावत, सुमित लुनावत, स्वदेश गांधी, ऋषभ सकलेचा, चेतन जांबड़, महावीर बोथरा, अनमोल खटोड़, निखिल दाहाले, ऋषभ पुगलिया उपस्थित होते. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top