Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपूर पेपरमील परिसरात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स बल्लारपूर - आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास पेपर मिल संपवेल परिसरात अज्ञात प्रेत आढळले. नेमके हे प्रेत कुणाचे आ...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
बल्लारपूर -
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास पेपर मिल संपवेल परिसरात अज्ञात प्रेत आढळले. नेमके हे प्रेत कुणाचे आहेत. याबाबत अजून ओळख पटली नाही. स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार पेपरमिल संपवेल आणि ऐतिहासिक किल्ला परिसरात काही कुख्यात गुंडाकडून मागील काही दिवसांपासून शस्त्र लापविण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यातच आज संपवेल परिसरात अज्ञात प्रेत आढळून आले आहेत. त्यामुळे हा घातपात तर नाही ना? असा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या या सुचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.
पेपरमिल परिसरातील संपवले परिसरात मोठ्या प्रमाणात अलीकडे झाडे झुडपे वाढलेली आहेत. स्थानिक काही गुंड याच झुडपांचा आश्रय घेऊन गांजा, दारू आणि ईतर मादक पदार्थांचे सेवन करून दिवसभर शहरात उद्रेक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा प्रत्यक्ष त्रास स्थानिक नागरिकांना होत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढवा असे मत स्थानिक नागरिकांच्या वतीने वर्तविले जात आहेत. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top