Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपुरात ३७ लाखांची चोरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
७० तोळे सोने, १५ लाख रोख लंपास    शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - शहरातील तुकूम परिसरातील VIP भागात मोठी घरफोडी झाल्याची घटना घ...
  • ७० तोळे सोने, १५ लाख रोख लंपास  

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शहरातील तुकूम परिसरातील VIP भागात मोठी घरफोडी झाल्याची घटना घडली. घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरटयांनी सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ३७ लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीची घटना तुकूम परिसरातील प्रकाश जयसवाल यांच्या घरी गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरु आहे. 
राजेंद्र उर्फ प्रकाश जयस्वाल असे फिर्यादीचे नाव आहे, जयस्वाल हे जिल्ह्यातील परवानाधारक सावकार आहे, सावकारी क्षेत्रात त्यांचं नाव मोठं गणले जाते. जयस्वाल यांच्या घरून अज्ञात चोरट्यानी 15 लाख रुपये रोख व 22 लाखांचे सोनं असा एकूण 37 लाखांची गुरुवारी रात्रीच्या सुमारा धाडसी चोरी केली.
गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात शहर व रामनगर डि बी पथक करीत आहेत, पुढील तपास रामनगर डीबी पथकाचे एकरे करीत आहेत. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top