Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाढदिवसाप्रसंगी गरोदर महिलेला पोषण आहाराची भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"बाळू" ची लोकचळवळीतून कुपोषणमुक्ती विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ  राजुरा - कोरोनाशी लढताना बालकांना कुपोषणापासून वाचविण्यासाठी‍ही...
  • "बाळू" ची लोकचळवळीतून कुपोषणमुक्ती
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ 
राजुरा -
कोरोनाशी लढताना बालकांना कुपोषणापासून वाचविण्यासाठी‍ही लोकचळवळीच्या माध्यमातून "बाळू" ची धडपड सुरु आहे. कोरोना काळात गरोदर महिलांना तसेच कुपोषित बालकांना पोषण आहार नियमित मिळावा याकरिता "बाळू Be A Part Of Loving unit" चे प्रयत्न सुरु आहेत आणि आपल्या हातून समाजातील शेवटच्या घटकाच्या नागरिकानापर्यंत काहीतरी मदत झाली पाहिजे तसेही नागरिक आहेत त्यातूनच आज युग रुपेश आस्वले याच्या सातव्या  वाढदिवसाप्रसंगी युगाच्या पाल्याकडून "बाळू" च्या माध्यमाने स्थानिक पंचशील वॉर्डातील आंगणवाडीत एका गरोदर मातेला सहा महिने पुरेल इतक्या पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी बाळूचे संस्थापक अमित महाजनवार, रुपेश आस्वले, प्रवीण यमनुरवार, दीपक शर्मा, अमोल ताठे, संतोष भटपल्लीवार, अक्षय सुर्तेकर, समीर राचर्लावार, अंगणवाडी सेविका दर्शना रागीट उपस्थित होते. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top