Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अँड. यादवराव धोटे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - अँड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित अँड. यादवराव धोटे महाविद्यालयात  ...
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
अँड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित अँड. यादवराव धोटे महाविद्यालयात  4 ऑगस्ट रोजी नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालाची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयातून 93% टक्के घेऊन विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या कुमारी निकिता तुळशीराम विद्दे तसेच गिरीराज संजय चांडक 92.66% द्वितीय तसेच कुमारी सानिका विशाल दुधे 92.16% तथा वाणिज्य शाखेचा कुणाल रामचंद्र भोंगळे 92.16% घेऊन महाविद्यालयातून तृतीय क्रमांक पटकाविला तसेच वाणिज्य शाखेची कुमारी रोशनी चंपत बोरकुटे हिने 92% घेऊन चतुर्थ क्रमांक पटकावला त्याचबरोबर कला शाखेची विद्यार्थिनी कुमारी नंदिनी शंकर कोरवते हिने 91.83% गुण प्राप्त करुन महाविद्यालयातून पाचवा क्रमांक पटकाविला तसेच इतर तीनही शाखेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर धोटे, उपाध्यक्ष अँड. संजय धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉ. अर्पित धोटे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या  मीनाक्षी कालेश्वरवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य इर्शाद शेख त्याचबरोबर प्रा. दिनेश दुर्योधन, महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेणुका पाध्ये, गुणवंत विद्यार्थ्यांचा पालक वर्ग, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य इर्शाद शेख, संचालन सांस्कृतिक विभागप्रमुख मनीषा राखुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गौरी पायतोड यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top