Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एक्सलन्स अवॉर्ड विजेते डॉ. संजय गोरे यांचा अँड. वामनराव चटप यांनी केला सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरद पवार महाविद्यालयाचे...
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरद पवार महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय गोरे यांना आतंरराष्ट्रीय  रिसर्च एक्सलन्स अवार्ड आणि बेस्ट टीचर ऑफ द ईयर अवार्ड हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी त्यांचे निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी गोरे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अँड.चटप यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी नगरसेवक दिलीप देरकर, मधुकर चिंचोलकर, दिलीप देठे, डॉ.अमृत गोरे, ज्ञानेश्वर माकोडे, घनश्याम हिंगाणे उपस्थित होते
डॉ. संजय गोरे हे पीएचडी  पदवीचे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त झालेली आहे. त्यांचे आजपावेतो 6 क्रमिक आणि संदर्भ ग्रंथ, तौलनिक शासन आणि राजनीती, तुलनात्मक शासन आणि राजकारण, भारतीय लोकशाही, पंचायतराज आणि आदिवासी नेतृत्व, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्था, चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी नेतृत्व ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यापूर्वी राजुरा भूषण सन्मान प्रदान करून त्यांचा गौरव झाला होता. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top