Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटे यांची तारसा खुर्द येथे भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे यंत्रणेला दिले निर्देश आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यातील मौजा तारसा (खुर्द) येथ...
  • आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे यंत्रणेला दिले निर्देश
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गोंडपिपरी -
गोंडपिपरी तालुक्यातील मौजा तारसा (खुर्द) येथे डेंगू सदृश्य ताप व साथीच्या रोगाने थैमान घातल्याने गावातील लोक आजारी पडत आहेत. एवढेच नाहीतर डेंगू तापाने दोन बळी गेले अशी माहिती आमदार सुभाष धोटे यांना कळताच त्यांनी तारसा खुर्द येथे भेट देऊन एकूणच परिस्थितीची पाहणी केली तसेच ग्रामपंचायत तारसा खुर्द येथे बैठक घेऊन संबंधित पदाधिकाऱ्यांना नागरिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपाययोजना करण्यासंदर्भात सुचना केल्या. तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन येथे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी निर्देश दिले. या प्रसंगी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच येथे परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगीतले. 
या प्रसंगी तहसीलदार  के. डी. मेश्राम, गटविकास अधिकारी साहेबराव बुलकुंडे, कृ.उ.बा.स संचालक संभूजी येलेकर, सरपंच अजय भोयर, उपसरपंच माधुरी येलेकर, ग्रा. प. सदस्य ममता चौधरी, संध्या वासेकर, विभा चांदेकर, आशा चंदे, शरद चोचले, राकेश अलोने, निकेश बोरकुटे, नितीन धानोरकर, पंढरी आनंदराव कोडपत्तुलवार यासह स्थानिक नागरिक उपास्थित होते. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top