Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे गजाननराव गावंडे गुरुजी यांच्या 79 व्या वाढदिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - दिनांक 1 जुलै 2021 रोजी माजी खासदार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय नरेशबाबू पुगलिया यांच्...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दिनांक 1 जुलै 2021 रोजी माजी खासदार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेसचे युवा नेता तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुलबाबू पुगलिया यांच्या शुभ हस्ते काँग्रेस कार्यालय गांधी चौक येथे किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक गजाननराव गावंडे गुरुजी यांच्या 79 व्या वाढदिवसा प्रित्यर्थ शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. व गुरुजींच्या 78 वर्ष पूर्ण करून 79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या गुरुजींचे भावी जीवन सुखमय समाधानी आरोग्यमय हो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेन्द्र बेले, नगरसेवक अशोक नागपुरे, कामगार नेते रामदास वागदारकर, काँग्रेसचे सुधाकरसिंह गौर, व्ही कुमार व नायर उपस्थित होते. 

बातम्या अधिक आहेत....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top