Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बचत गटातुन महिलांनी प्रगती साधावी - विजय बावणे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर -  बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उंच भरारी घेत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, प्रगती...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर - 
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उंच भरारी घेत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, प्रगती साधली तसीच प्रगती महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून साधावी असे आवाहन मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष विजयरावजी बावणे यांनी गडचांदूर येथील मध्यवर्ती सहकारी बँक गडचांदूर येथे स्वयंसहायता महिला बचत गट कर्ज वितरण व मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले. 
नाबार्ड पुरस्कृत डिजीटल व साक्षरता शिबीर अंतर्गत चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा गडचांदूर येथे स्वयंसहायता महिला बचत गट कर्ज वितरण व मार्गदर्शन मेळावा नुकताच काल पार पडला.  या कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष विजयरावजी बावणे, तर या मेळाव्याचे उदघाटक बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शेखर धोटे, संचालक पांडुरंग जाधव,संचालक ललित मोटघरे, संचालिका नंदाताई अल्लुरवार, नाबार्ड जिल्हा विकास व्यवस्थापक तृणाल फुलझेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यानी उपस्थित स्वयंसहायता महिला बचत गट च्या महिलांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपस्थित पाहुणेच्या हस्ते चौदा महिला बचत गटांना पंधरा लाख अंशी हजार रुपयांचे कर्ज वाटप केले.
कार्यक्रम प्रसंगी विभागीय अधिकारी मा सय्यद, वडगावकार, शाखा व्यवस्थापक जोगी, अशोक पवार व शाखा निरीक्षक प्रशांत बलकी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रशांत बल्की यांने मानले.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top