Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकऱ्यांने विष प्राशन करून केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर - कोरपना तालुक्यातील निमणी येथील शेतकऱ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना  उघडक...

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
कोरपना तालुक्यातील निमणी येथील शेतकऱ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली आहे. बुधवारला सकाळी ११ वाजता ही घटना उघडकीस आली गजानन सदाशिव गौरकार वय ५५ असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

स्वतःच्या ४ एकर शेतीत कापूस तूर व भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन परिवारांचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या गजानन गौरकार या शेतकऱ्यांनी सततच्या नापिकी, आर्थिक संकट, सावकारी कर्जाच्या विवंचनेतून स्वतःच्या राहत्या घरी कॉन्फिडॉर नावाचे किटकनाशक विष प्राशन केलें असता त्यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे भरती करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने तेथील डाँक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर केले. अतिदक्षता विभागात २ वाजता डॉक्टरांच्या चमूने मृत घोषित केल्याची माहिती दिली त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे निमणी गावात शोककळा पसरली असून बुधवारला सायंकाळी ८ वाजता मालटोकणी नाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top