Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रापं विहिरगाव येथे लसीकरण संदर्भात उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - ग्रामपंचायत विहीरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये कोरोना लसीकरण मोहीम संदर्भात राजुरा...


विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
ग्रामपंचायत विहीरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये कोरोना लसीकरण मोहीम संदर्भात राजुरा चे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे साहेब यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीत शंभर टक्के लसीकरण संदर्भात उपविभागीय अधिकारी खलाटे साहेब यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मार्गदर्शन केले व नागरिकांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. 

जनजागृती सभेत नायब तहसीलदार गांगुर्डे, सरपंच ॲड. रामभाऊ देवईकर, तालुका आरोग्य अधिकारी नगराळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच नीलकंठ खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व कर्मचारीवृंद, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन इरशाद शेख यांनी तर आभार सचिव सूर्यवंशी यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top