Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शासकीय आयटीआय मध्ये वृक्षारोपण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
JCI राजुरा प्राईड चा उपक्रम विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वृक्षा...

  • JCI राजुरा प्राईड चा उपक्रम
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वृक्षारोपण करण्यात आला. ‘पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्यच आहे. यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे,’ असे आवाहन प्राचार्य वैभव बोनगीरवार यांनी केले. JCI राजुरा प्राईड तर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या परिसारत मातीचा पोत पाहून विविध प्रकारचे आंबे, जाम व बदाम या फळ जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूची कमतरता भासत होती. नैसर्गिक पद्धतीने वृक्षारोपण करून वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याकरिता वृक्षारोपण राबवून सकारात्मक बदल घडविण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती जेसीआय राजुरा प्राईड शाखेचे अध्यक्ष जेसी अंकुशसिंह चौहान यांनी दिली. यावेळी प्राईडचे संस्थापक अध्यक्ष जेसी श्रीगोपाल सारडा, सचिव जेसी जहिर लाखानी, माजी अध्यक्ष जेसी व्यंकटेश गड्डम, जेसी संदीप खोके, जेसी श्वेता जयसवाल, जेसी शारदा गड्डम, जेसी संदीप जैन, जेसी विभा सिंग, जेसी गुडिया सिंग सह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top