Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा राजेंद्...

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा राजेंद्र काकडे हिने नुकतेच आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्र बनवून भेट दिले. आमदार सुभाष धोटे यांनी नुकतीच बिबी येथे भेट दिली असता त्यांना एका छोट्या कार्यक्रमामध्ये या तैलचित्राची भेट देण्यात आली. यावेळी कलावंत स्नेहा काकडे हिच्यासोबत तिचे वडील राजेंद्र काकडे, आई लता काकडे, मोठे वडील नत्थु काकडे, मोठी आई पुष्पा काकडे, बहीण अंकिता, भाऊ निखिल उपस्थित होते. आमदार सुभाष धोटे हे जरी आमदार असले तरी ज्या गडचांदूर शिक्षण संस्थेमध्ये स्नेहाने शिक्षण घेतले त्या संस्थेचे ते संस्था अध्यक्ष होते. त्या कृतज्ञतेने तिने तैलचित्र तयार केल्याचे सांगितले.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top