- आम आदमी पार्टी बल्लारपूर ने केली लवकर चेंबर बसविण्याची मागणी
बल्लारपुर -
आम आदमी पार्टी बल्लारपूर चे शहरअध्यक्ष रविकुमार शं. पुप्पलवार यांच्या नेतृत्वात नगर परिषद, बल्लारपूरचे मुख्य अधिकारी विजय सरनाईक यांना सर्व खुल्या नाल्यांवर चेंबर बसविण्याची मागणी करण्यात आली. बल्लारपूर शहर व शहराच्या स्वच्छतेकडे चांगल्या लक्ष देण्याबाबतही चर्चा करण्यात आली, बल्लारपूर शहरात झालेल्या आम आदमी पक्षाच्या वार्ड सर्वेक्षणात बहुतेक भागातील नालयांवर चेंबर नाही किंवा तुटलेली चेंबर असल्याबद्दल विविध वॉर्डांकडून लेखी व तोंडी स्वरूपात माहिती प्राप्त झाली आहे, आम आदमी पार्टी बल्लारपूर शिष्टमंडळाने यासंदर्भात सविस्तर चर्चा करून योग्य त्या निर्देश द्यावा, दुर्घटने सारख्या अनुचित घटनेपूर्वी त्वरित चेंबर उभारण्याची मागणी केली.
निवेदन देताना बल्लारपूर शहराचे अध्यक्ष रविकुमार पुपलवार, उपाध्यक्ष सय्यद अफझल अली, शहर सचिव अँड. पवन वैरागडे, शहर कोषाध्यक्ष आसिफ हुसेन शेख, शहर संघटन मंत्री निलेश जाधव, बल्लारपूर शहर शेतकरी आघाडी प्रमुख सुधाकर गेडाम, विक्की झांबरे, समशेरसिंग चौहान, इर्शाद अली, कृष्णा मिश्रा, आदर्श नारायणदास आणि इत्यादी "आप" कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या अधिक आहेत.....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.