Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोंभुर्णा तालुक्यात अस्वलीने केला नागरिकांवर हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
4 जण गंभीर जखमी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स पोंभुर्णा - चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सातारा तुकुम येथील कक्ष क्रमांक-436, क...

  • 4 जण गंभीर जखमी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
पोंभुर्णा -
चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सातारा तुकुम येथील कक्ष क्रमांक-436, कक्ष क्रमांक-435 येथे गुराख्यानी आपआपले गुरे चरायला नेले असता दाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाने अचानकपणे हल्ला केला. एकाच दिवशी दोन ठिकाणी अस्वलीच्या हल्ल्यात 4 नागरिक गंभीर जखमी झाले.

पहिल्या घटनेत सातारा तुकुम कक्ष क्रमांक-436 येथे गुरे चारणार्‍या 57 वर्षीय आणि 54 वर्षीय नागरिक अस्वलाच्या हल्लात गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या घटनेत सातारा तुकुम कक्ष क्रमांक -435 (FDCM) येथे गुरे चारणार्‍या 45 वर्षीय आणि 32 वर्षीय नागरिक अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाले. हि घटना शनिवारी 3 जुलै ला 1 वाजताच्या सुमारास घडली.

सातारा तुकुम येथील विलास तुकाराम पेंदोर वय 54 वर्ष, सीताराम किसन मडावी वय 57 वर्ष यांनी कक्ष क्रमांक-436 नेहमी गुरे जंगलात चरण्याकरीता नेत असतात मात्र 3 जुलै ला दाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाच्या केलेल्या हल्यात गंभीर जखमी झाले.

तर दुसऱ्या घटनेत सातारा तुकुम येथील प्रफुल रघुनाथ सिडाम वय- 45 रा. सातारा तुकुम, रुपेश गजानन कुळमेथे वय. 32 रा.भानसी ता. सावली यांनी सातारा तुकुम कक्ष क्रमांक-435 (FDCM) गुरे जंगलात चारण्याकरीता नेले असता दाट जंगलात दबा धरुन बसलेल्या अस्वलाच्या हल्यात जखमी झाले.

सदर घटनेची माहिती वनविभागास मिळाली असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. ४ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. गंभीर जखमी विलास तुकाराम पेंदोर यांच्या कुटुंबांना वनविभाग कर्मचारी मडावी यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आली.

बातम्या अधिक आहेत.....


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top