Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाविकास आघाडीचे सरकार गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी संकल्पबद्ध - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खावटी अनुदानातून राजुरा, गडचांदूर व कोरपना येथे लाभार्थ्यांना अन्नधान्य किटचे वितरण  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गड़चांदूर - खा...
  • खावटी अनुदानातून राजुरा, गडचांदूर व कोरपना येथे लाभार्थ्यांना अन्नधान्य किटचे वितरण 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गड़चांदूर -
खावटी अनुदान योजने अंतर्गत अनुसूचित जमाती कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे "अन्नधान्य किट वाटप" वितरण कार्यक्रम आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली गोपिकाबाई सांगडा आश्रमशाळा राजुरा, शासकीय आश्रम शाळा देवळा, स्वर्गीय भाऊराव पाटील आश्रम शाळा कोरपना, स्वर्गीय भाऊराव पाटील आश्रम शाळा गडचांदूर येथे आयोजित करण्यात आले. 
याअंतर्गत राजुरा तालुक्यातील 2833, कोरपना तालुक्यातील 1912, जिवती तालुक्यातील 2886 गोंडपिपरी तालुक्यातील 1324 असे राजुरा विधानसभा क्षेत्रात एकूण जवळपास 7955 लाभार्थी आदिवासी कुटुंबियांना लाभ मिळणार आहे. किराणा स्वरुपात असलेल्या या किटमध्ये १२ वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. यात मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तर डाळ, साखर, शेंगदाने तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती इत्यादींचा समावेश आहे.
 या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित लाभार्थी कुटुंबांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संकल्प बद्ध आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हे कीट गरजूंना जीवनदायी ठरणार आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी नागरिक असून जिवती तालुक्यात हे प्रमाण जवळपास ७५ टक्क्यांच्या आसपास आहे. खावटी अनुदान योजनेकरीता आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला तसेच आदिवासींकरीता असलेल्या शबरी योजना, ठक्कर बाप्पा आणि इतर योजनेचे माध्यमातून आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा आमचा मानस आहे.
या प्रसंगी राजुरा व देवाळा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरनुले, प स सदस्य तुकाराम माणुसमारे, कुंदा जनेकर, बामनवाडा च्या सरपंच भातरी पाल,  देवळा  सरपंच लक्ष्मीताई पंधरे, कोरपना येथे जि.प.सदस्य विनाताई मालेकर, कल्पनाताई पेचे, उपसभापती सिंधुताई आस्वले, श्यामभाऊ रणदिवे, उत्तमराव पेचे, सिताराम कोडापे, संभा पाटील कोवे, भाऊराव पाटील चव्हाण, नितीन बावणे, सुरेश मालेकर, संगीता पंधरे, रोशन आस्वले, गडचांदूर येथे नगराध्यक्षा सविता टेकाम विक्रम येरणे, आशिष देरकर, उमेश राजूरकर, संतोष महाडोळे, पापा आर्या, सतीश बेतावर, विलास मडावी, रुपेश चौधरी, अरविंद मेश्राम, शैलेश लोखंडे यासह स्थानिक आदिवासी बांधव, शिक्षक वृंद, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top