Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विद्यार्थ्यांना नोटबुकांचे वाटप व वृक्षारोपण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - शिक्षण प्रसारक मंडळ गड़चांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय उच्च माध्यमिक विद्या...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
शिक्षण प्रसारक मंडळ गड़चांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर च्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्य सौ, स्मिताताई चिताडे यांच्या प्रेरणेतून निमणी येथील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप व वृक्षारोपण करण्यात आले, तसेच गडचांदूर परिसरातील गावात वृक्षारोपण पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामसेवक हस्ते निमणी ग्रामपंचायत च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास कोंगरे, शिक्षक संजय पोगुलवार, तुकाराम धर्वे अंकुश काकडे, वैशाली हॅपट, किरण पोगुलवार, स्वाती केळकर, प्रतिभा गेडाम आदी उपस्थित होते, ग्रामसेवक शुभांगी ढवळे म्हणाल्या की कोरोना काळात शाळा बंद असतांना महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक शिक्षण आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना जानाचे धड़े देत असल्याने त्यांचे कौतुक केले, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच प्रा, उमेश राजूटकर यांचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे संचालन तुकाराम यांनी केले तर आभार प्रतिभा गेडाम यांनी मानले. यावेळी गावकरी विद्यार्थी उपस्थित होते. 











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top