Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गुप्ता वॉशरीज विरोधात 8 जुलैला कामगारांचे ठिय्या आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घुस - येथील महामीनरल माइनिंग अँड बेनिफिकेशन प्रा. लिमिटेड घुग्घुस युनिट ही कोल वाशरीज मागील तीन महिन्यांप...


आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घुस -
येथील महामीनरल माइनिंग अँड बेनिफिकेशन प्रा. लिमिटेड घुग्घुस युनिट ही कोल वाशरीज मागील तीन महिन्यांपूर्वी शुरू झाली असून याठिकाणी पाच मोठया ट्रान्सपोर्टरना कोळसा वाहतुकीचे काम देण्यात आले. या मोठ्या ट्रान्सपोर्टर द्वारे घुग्घुस परिसरातील दीडशे चालक - मालक यांचे शोषण करण्यात येत आहे.

एकीकडे डीजल दर दररोज वाढत असतांना वाहतूक भाड्यात मोठी कपात करून स्थानिकांचा शोषण करीत असल्याने सदर चालक मालक यांनी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांना मदद मागितली स्थानिकांच्या हक्कासाठी चालक मालक यांना घेऊन गुप्ता वॉशरीज येथे हल्लाबोल करण्यात आले.

आठ दिवसांत काम देण्याची मागणी करण्यात आली मात्र व्यवस्थापका तर्फे कुठलाच तोडगा न निघाल्याने दिनांक 08 जुलै रोजी दीडशे वाहना सह वॉशरीजच्या मेन गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून यात परिसरातील सर्व चालक मालक यांनी सहभागी होण्याचे आवाहन राजूरेड्डी यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top