Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गरीबाची ईद सुध्दा साजरी व्हावी - अँड. जावेद शेख
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
समाजबांधवांनी आप-आपल्या घरीच नमाज अदा करावी कोविड 19 चा नियमाचे समाजबांधवांनी पालन करावे धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर -...
  • समाजबांधवांनी आप-आपल्या घरीच नमाज अदा करावी
  • कोविड 19 चा नियमाचे समाजबांधवांनी पालन करावे

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मुस्लिम पिंजारा ओबीसी जमात जिल्हा चंद्रपूर चे शाखेला हिंगणघाट वाले सलीम यांनी तीस धान्याचे किट वितरण करण्यासाठी चंद्रपूर येथील जिल्हा कमिटी ला स्वाधीन केले याच प्रमाणे इतर समाज बंधूंनी आपापल्या परीने या पुण्याच्या कामात हाथभार लावावा असे जिल्हाध्यक्ष शेख इरफान यांनी या प्रसंगी विचार व्यक्त केले. याप्रसंगी समाजाचे चंद्रपूर कमेटीचे अड. जावेद शेख, शफी शेख, वणी येथील आसिफ शेख, प्रा.नजीर शेख व इतर बांधव उपस्थित होते.
मागील दोन वर्षात कोरोना मुळे सर्व गरीबाची आर्थिक स्थिती डबघाईस आली असून आज गरीबांना आर्थिक मदतीची गरज आहे सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरी नमाज अदा करावी एका ठीकानी जास्त नागरिकांनी जमू नये कविड 19 चा नियमाचे सर्वांनी पालन करावे असे कमिटीच्या वतीने सर्वांनी सूचित करण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top