Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि महानगर पालिका द्वारे जलाराम मंदिर मध्ये लसीकरण केंद्र सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्येच लसीकरणाचं प्रमाणदेखील वाढवि...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्येच लसीकरणाचं प्रमाणदेखील वाढविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आता लसीकरण केंद्रे हि वाढविण्यात आली असून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मनपा प्रयत्न करीत आहे. 
स्थानिक जलाराम मंदिर मध्ये फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि महानगर पालिका द्वारे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून यात जवळपास २३० नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आव्हान फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रामकिशोर सारडा, चिराग नथवानी, रामजीवन परमार, मनीष राजा, प्रभाकर मंत्री, दिनेश नथवानी, दिनेश बजाज, अजय कोतपल्लीवार, शशी ठक्कर यांनी केले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top