Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दालमिया सिमेंटचे उत्पादन ठप्प, आंदोलन सुरूच ; आंदोलनाचा पाचवा दिवस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दालमिया कामगाराच्या आंदोलन मंडपाला रा.काँ. पदाधिकाऱ्यांची भेट धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - कोरपना तालुक्यातील दालमिया...

  • दालमिया कामगाराच्या आंदोलन मंडपाला रा.काँ. पदाधिकाऱ्यांची भेट
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट उद्योगाविरोधात स्थानिकांनी पुकारलेल्या उत्पादन बंद आंदोलन शनिवारला सलग पाचव्या दिवशीही सुरूच असून शासन व प्रशासनाने येत्या १५ जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने कामगार संघटनांनी कंपनीतील किरकोळ कामे करण्याची मुभा देत आंदोलन सुरूच ठेवले आहे. शासनाने यावर योग्य तोडगा न काढल्यास पुन्हा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नारंडा कामगार संघ व हिंद मजदूर महासंघाने दिला आहे. 

नुकत्याच सुरू झालेल्या दालमिया सिमेंट कामगार शोषण विरोधात कामगार संघटनेने गेल्या चार दिवसापासून आंदोलन सुरू केले असून तीन दिवस कंपनीचे कामकाज ठप्प पडले होते. यापूर्वी मुरली सीमेंट प्रकल्पामध्ये स्थानिक 900 मजूर कामावर होते यापैकी पूर्वीच्या कंपनीने कामावर असलेल्या कामगारांचे 13 टक्के देयके दिली असून उर्वरित कामगारांना त्यांचा कामाचा मोबदला दिला नाही. तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्त जमीन बाधित कायमस्वरूपी कंत्राटी कामगार यांना कामावर न घेता गेल्या सहा महिन्यापासून परप्रांतीय मजुरांच्या मार्फतीने कामाची सुरुवात केली मात्र स्थानिक मजुरांना डावलून दोन हजार तीनशे मजूर सध्या कार्यरत असून 85 कंत्राटदार मार्फत काम सुरू आहे मात्र दोन हजार पेक्षा अधिक मजूर परप्रांतातील असून स्थानिक मजुरावर कंपनी अन्याय करीत असल्याचा आरोप कामगारांनी लावला आहे. 

यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचा भडका उडत असून कामगारांना व स्थानिक मजुरांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे याकरिता आंदोलन सुरु आहे. कामगारांच्या सभा मंडपाला सर्वच पक्षांनी भेट दिली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, कामगार नेते प्रमोद मोहोळ, विधानसभा राष्ट्रवादी चे अध्यक्ष अरुण निमजे, सुरेश पाटील काकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जिल्हा उपाध्यक्ष स आबीद अली, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद जोगी, सुनील, कामगार नेते रमेश, वक्ते गजानन खाडे, मनोज बटाळकर, गुरुदास तावरे यांनी सभा मंडपाला भेट देत कामगारांशी संवाद साधून समस्या जाणून घेतली. कामगारांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रशासन व कंपनी व्यवस्थापन यांनी पुढाकार घ्यावा स्थानिक कामगारांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावे असे मत राजेंद्र वैद्य यांनी व्यक्त केले.

बातम्या अधिक आहेत......

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top