Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: थेंबभर पाणी नाही! मात्र, पाणीपट्टी आली दोन हजाराची
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपुर प्राधिकरण विभागाचा अनाधोंगी कारभार ग्राहकांना होतो मनस्ताप रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपुर - "नळाचे नवीन कनेक्शन...

  • बल्लारपुर प्राधिकरण विभागाचा अनाधोंगी कारभार
  • ग्राहकांना होतो मनस्ताप
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपुर -
"नळाचे नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी दोन वर्षापूर्वी अर्ज केला. निर्माणाधिन कामाचे कारण देत, डिमांड भरूनही पाण्यासाठी दोन वर्ष ताटकळत ठेवले. आणि पाण्याचा एक थेंबही न देता, महावितरणकडून चक्क पाहिली पाणीपट्टी सतराशे रुपयांचे तर दुसरी पाणीपट्टी दोन हजाराची पीडित ग्राहकाला देण्यात आली. या घडलेल्या प्रकारातून प्राधिकरण विभागाचा अनाधोंगी कारभार दिसून येत आहेत."

शहरातील वाढती लोकसंख्या आणि जीर्ण झालेल्या पाईपलाईन पाहता, नागरिकांना २४ तास शुद्ध पाणी मिळावे याकरीता प्राधिकरण विभागाकडून शहरात १२००० नवीन नळजोळणी'चा प्रस्ताव आखण्यात आला. राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री तथा बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांच्या हिताच्या या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळवून देण्यासोबतच या कामाकरीता कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, प्राधिकरण विभागाचे नियोजन चुकले. परिणामी दोन वर्षे लोटली मात्र, काम काही पूर्ण झाले नाही. हे काम पूर्ण होण्यास साधारणता पुन्हा दोन वर्षे लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नळ कनेक्शनसाठी दोन वर्षांपूर्वी डिमांड भरूनही ग्राहक आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे मात्र, प्राधिकरण विभागाच्या बेजवाबदारपणामुळे नळजोळणी झाली कि नाहीचं नाही. शिवाय घरी कनेक्शन आहे किव्हा नाही याची कसलीही शहानिशा न करता ग्राहकांना पाणीपट्टी पाठविणे सुरू केले आहेत. एक-एक करता आतापर्यंत अश्याप्रकारे शेकडो ग्राहकांना पाणीपट्टी पाठविल्याचे निदर्शनात येत आहेत. 

तक्रारदार रमेश शितलप्रसाद निषाद यांनी नळ कनेक्शनसाठी दोन वर्षांपूर्वी म्हणजे ११ जुलै २०१९ रोजी नळजोळणीसाठी डिमांड भरला. आतापर्यंत घरी साधे नळ कनेक्शन लागले नाही. त्यामुळे थेंबभर पाणी न मिळता मागील दोन महिन्यांपासून हाती येणारी हजारो रुपयांची महिनाभरासाठी आकारलेली पाणीपट्टी द्यायची तरी कशी. असा यक्षप्रश्न आता दोन वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा करणारे ग्राहक रमेश शितलप्रसाद निषाद यांच्यासमोर उपस्थित झाली आहेत. प्राधिकरण विभागाकडून दर महिन्याला मीटर रिडींग घेऊन त्याच्या वापरानुसार पाणीपट्टी आकारली जाते. मात्र, ज्याच्याकडे नळच नाही. तर मीटर आलाच कुठून? आणि ग्राहक होण्याआधीच ग्राहक क्रमांक DR-13150 हा आलाच कुठून?आणि पाणीपट्टी आलीच कशी? अलीकडे कारण नसतांना कमी वापर करणाऱ्या ग्राहकांनाही जास्तीची पाणीपट्टी आकारण्यात येत असल्याची अनेक ग्रहकांची ओरड आहेत. तर पाण्याची चोरी आणि दोन-दोन कनेक्शन ठेवणाऱ्या हितचिंतक ग्राहकांना सवलत, व इमानदारीने भरणा करणाऱ्यांकडून वाढीव आकारणी या धोरणाचा अवलंब होत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहेत. कधी फॉल्टी मीटर तर कधी तांत्रिक कारण सांगून मिनिमम आकारणीच्या नावे अव्वाच्या सव्वा पाणीपट्टी देऊन ग्राहकांची पिळवणूक केली जात आहेत. अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. या संदर्भात प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. अशी मागणी आता  ग्राहकांकडून केली जात आहेत.

संगणकीय तांत्रिक दोषातून ते बिल तयार झाले. आणि ग्राहकापर्यंत पोहचले. यापुढे ग्राहकांना त्रास होणार नाही. याची खबरदारी घेऊ.
सुशील पाटील
उपविभागीय अभियंता, म.जी.प्रा.जलव्यवस्थापन उपविभाग, बल्लारपुर

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top