Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पर्यटकांना 'भुरळ' घालणारा सहस्त्रकुंड धबधब्याचे रौद्ररूप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - महाराष्ट्रातील आकर्षक, मनमोहक धबधब्याच्या शृंखलेतील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटक...


रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
महाराष्ट्रातील आकर्षक, मनमोहक धबधब्याच्या शृंखलेतील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांच्या व निसर्गप्रेमींना 'भुरळ' घालणारा आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर हा धबधबा असून विदर्भातील यवतमाळ व मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात याचा समावेश होतो. हा आकर्षक धबधबा यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड व नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर, किनवट तालुक्यात आहे. पैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात एका ठिकाणी असलेल्या खडकात निर्माण झालेल्या भल्या मोठ्या दरीमुळे हा धबधबा निर्माण झाला आहे. पौराणिक कथेनुसार भगवान परशुराम यांनी क्रोधीत होऊन येथे त्यांचे 'परश'(फरश) हे शस्त्र आपटले होते आणी त्यातून येथे नदीपात्रात खोल दरी निर्माण झाली. ते काहीही असो आज मात्र वर्षानुवर्ष येथे हा धबधबा पहाण्यासाठी राज्य व देशभरातून लाखो पर्यटक येतात. हा धबधबा हा अत्यंत धोकादायक देखील आहे त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन सुरक्षित अंतरावरून तो पहावा. धबधबा ज्या दरीत आदळतो त्या दरीची खोली अजूनही किती आहे याचा अंदाज लागलेला नाही. हा धबधबा व परिसरातील दाट वनराई चा आनंद पर्यटकांनी एकदातरी नक्की अनुभवावा असा आहे. नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणावरून १३५ किलोमीटरवर तर यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणावरून १८५ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. उमरखेड वरून ७०,किनवट वरून ३० तर हिमायतनगर वरून २५ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. धबधब्याच्या तिरावर पौराणिक पंचमुखी महादेव मंदिर आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top