- जलसंचयन करिता खोलीकरण करा - आबिद अली
गडचांदूर -
राजुरा विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल नक्सल नक्षल प्रभावित जंगल व्याप्त दुर्गम भागाने वेढलेल्या माणिकगड डोंगरपायथ्याशी तीन दशकांपूर्वी शेतकऱ्यांचे सिंचन व उत्पादन वाढ व्हावी म्हणून नाबार्ड सहाय्यीत पकडीगड्डम मध्यम प्रकल्पाला तत्कालीन वन पर्यावरण मंत्री कमलनाथ यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली होती सन 1989 ते 92 या कालावधीत मुख्य भितीचे बांधकाम पूर्ण करून सन 1993-94 मध्ये जल संचयन करण्यात आले. मात्र जल संचयन क्षेत्रातील ओढे, नाले, डोंगरी भागातील टेकड्या व मातीचे ढिगारे सपाटीकरण खोलीकरण ही कामे सोडून देण्यात आली होती उपरोक्त प्रस्तावामध्ये 11.0 7 दलघमी जलसाठे अपेक्षित होते व या आधारे विसर्ग सांडवा बनविण्यात आला मात्र खोलीकरण सपाटीकरण न झाल्याने ११.०७ दलघमी जलसाठे करणे शक्य झाले नाही परिणामता गेल्या तीन दशकांपासून ७.०० दलघमी जलसिंचन साठे उपलब्ध झाले व उर्वरित पाणी काम अपूर्ण व दुर्लक्षित राहिल्याने सांडव्याच्या मार्गाने वाहून गेले प्रत्यक्ष उपलब्ध जल संचयन यामधून ३.०३ अंबुजा सिमेंट उद्योगाच्या वाणिज्य कामाकरित व०.५३ सोनुर्ली प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेकरिता आरक्षित असल्याने प्रस्तावित आराखड्यानुसार लाभ क्षेत्रातील शेती सिंचनाकरिता 2968 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित अपेक्षित होते गेल्या तीस वर्ष पासून जल संचयन करून देखील सिंचनाचे उद्दिष्ट पाटबंधारे विभागाला साध्य करता आलेले नाही 14 गावांपैकी एकही गाव 100% सिंचनाखाली आलेले नाही हे विदारक चित्र समोर असून शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे तसेच पाणीपट्टी कर आकारणी व प्रत्यक्ष सिंचन एक हजार ते बाराशे हेक्टर रब्बी व खरीप हंगामासाठी सिंचनाखाली बांधापर्यंत पाणी पोहोचते मात्र या लाभ क्षेत्रातील 60 टक्के शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर अजूनही पकडम जलाशयाचे सिंचनाचे पाणी पोहोचलेले नाही आजतागायत ही गावे सिंचनाच्या लाभापासून वंचित आहे गावालगत पाणीसाठे असतांना भूमातेची तुष्णा भागली नसल्याने काळ्या मातीला हिरवा शालू अजूनही शेतकऱ्यांच्या नशिबी आलेला नाही या परिसरातील अनेक गावांना दुष्काळाचे सावट व पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावतो गेल्या तीस वर्षापासून लाभ क्षेत्रातील पिपरडा कुसळ धानोली वनसडी दहेगाव पा रंभा खैरगाव सोनुरली चिंचोली बेलगाव वडगाव इंजापुर खिरडी कारगाव बु या भागातील लघु कालवे अर्धवट तूट अवस्थेत पडली आहे यापैकी अर्धे अधिक गावे सिंचनापासून वंचित असून खिर्डी या टोके वरील गावाला गावाला अजूनही पाणी पोहोचले नाही किलोमीटर अंतरावरील कुसळ देवघाट पिपरडा या शिवारात पाणी पोहोचण्यासाठी अनेक अडचणी आहेत अनेक ठिकाणी लघु कालवे तूट झाल्याने कालव्याचे पाणी अर्धे अधिक ओघळी किंवा नाल्याने वाहून वाया जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हरित क्रांतीचे स्वप्न धुळीस मिळाले आहे लाभ क्षेत्रातील शेतीच्या बांधावर पाणी पोचविण्यासाठी भरीव निधीची गरज असतांना मात्र कालव्याच्या सांडल्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून सांडवे तयार करण्यात आले मात्र खोलीकरण पाटचारी कालवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने सांडव्याच्या कामावर झालेला खर्च कोणत्याही उपयोगात आलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली यांच्या नेतृत्वात शेतकर्यांचे शिष्टमंडळ जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील विदर्भ दौऱ्यावर असताना यांची भेट घेऊन पकडी गड्डम प्रकल्पाचे खोलीकरण सपाटीकरण लाभक्षेत्रातील सांडव्याची दुरुस्ती पाटचारी ची कामे प्रकल्पाकरिता भूसंपादन केलेल्या शेत जमिनीचा मोबदला भूभाडे ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना मोबदला व या भागातील लघू कालव्याच्या कामासाठी धरणाचे खोलीकरण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जलसंपदामंत्री खासदार पालक मंत्री आमदार संचालक पाटबंधारे महामंडळ अधीक्षक अभियंता यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.