Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: JBCCI मुख्य सदस्य पदावार निवड झाल्याबद्दल धनगर समाज तालुका राजूरा कडून सुधीर घुरडे यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - आमचा विदर्भ उपसंपादक राजुरा - वेकोलिच्या JBCCI मुख्य सदस्य पदावार निवड झाल्याबद्दल धनगर समाज तालुका राजूरा कडून अखिल भारतीय को...

अनंता गोखरे - आमचा विदर्भ उपसंपादक
राजुरा -
वेकोलिच्या JBCCI मुख्य सदस्य पदावार निवड झाल्याबद्दल धनगर समाज तालुका राजूरा कडून अखिल भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे केंद्रीय महामंत्री सुधीर घुरडे सुधीर घुरडे यांचा सत्कार करण्यात आला. 

वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात वेकोलि कामगार म्हणून कार्यरत स्थानिक माणूस मजदूर संघाचे नेतृत्व करीत वेकोलितील JBCCI मुख्य सदस्य पदावार निवड झाल्याबद्दल धनगर समाज तालुका राजूरा च्या वाटून नुकताच सुधीर घुरडे यांचा सत्कार सास्ती कॉलोनी येथील विश्वकर्मा भवनात करण्यात आला. समाजातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सुधीर घुरडे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत गौरवण्यात आले. यावेळी 

पुंडलिकराव उराडे यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करत युवा पिढीला घुरडे यांच्या कडून शिकण्यासारखे बरेच काही आहे आपणही त्यांचेशी मार्गदर्शन घेऊन आपल्या समाजाचे आपल्या परिसराचे नावलौकिक करावे असे आवाहन केले. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून अनिल निब्रड, कैलास उराडे, रुपेश चिडे प्रामुख्याने  उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य धनगर समाज बांधव तसेच वेकोली अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन समाजाचे सचिव प्रा. धनंजय डवरे यांनी तर आभार प्रदर्शन चरणदास झाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यश्वीतेकरिता अनंता गोखरे, दिनेश पोतले, संतोष दवंडे, चरदास झाडे, भाऊराव खाडे, धनंजय डवरे, कापडे, बुराडे सर, विठल येवले  यांनी परिश्रम घेतले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top