Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन विद्यार्थिनींना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते १० हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च मा...


धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदुर ता. कोरपना येथील विद्यार्थिनी कु आरती भास्कर थेरे आणि  कु. शिवानी दादाजी अडकिने यांनी इंडोर नेपाल इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियन मध्ये सहभागी होऊन आपले, शाळेचे व गडचांदूर चे नाव कमावले. म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून दोघींना प्रत्येकी 10000/-(दहा हजार रुपये फक्त) धनादेश आमदार सुभाष धोटे यांचा हस्ते वितरीत करण्यात आले. 

या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक तथा संस्थेचे संचालक डॉ. अनिल चिताडे, उपाध्यक्ष राहुल बोढे, प्रभारी सचिव धनंजय गोरे, संचालक विठ्ठल थिपे, विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे, प्राचार्य कृष्णा बत्तुलवार, डॉ. अनिस खान, प्रा. चेतन वानखेडे आदी मान्यवर उपस्थीत होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top