Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: झरीजामणी - कांग्रेसच्या वतीने ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात पंतप्रधानांना निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रेमकुमार नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी झरीजामणी - झरीजामणी काँग्रेसच्या वतीने ओबीसी समाजाचे  राजकीय आरक्षण सर्वोच्य न्यायालयाकडून रद्द क...
प्रेमकुमार नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
झरीजामणी -
झरीजामणी काँग्रेसच्या वतीने ओबीसी समाजाचे  राजकीय आरक्षण सर्वोच्य न्यायालयाकडून रद्द करण्यात आले या मागे केंद्र सरकार व  तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस तर्फे करण्यात आला  ओबीसी जनतेवर झालेल्याअन्यायाचा कॉन्ग्रेस कडून निषेध करण्यात आला व सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले स्वराज संस्थेतील ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात यावे या संदर्भात शनिवारी  तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन  देण्यात आले   या वेळी काँग्रेस चे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आशिष कुलसंगे (तालुका अध्यक्ष झरी जामनी)यांच्या नेतृत्वाखाली वणी विभागीय अध्यक्ष य. जि. म.स.बँक संचालक राजीव    यल्टीवार  महिला अध्यक्ष संगीत नाकले,भूमारेड्डी बाजनलावार, (माजी झरी पं.स.सभापती) संदीप बुरेवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती निलेश  यल्टीवार  सरपंच दिग्रस तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल दांडेकर भगवान चुकलवार  केशव नाकले, हरिदास गुर्जलवार सचिन  टाले निखिल चोधरी व सर्व झरीजामणी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top