Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अपघातात मृत पावलेल्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य तथा सानुग्रह मदत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुका खैरे कुणबी समाज मंडळाचा पुढाकार आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील मौजा पाचगाव येथील निवासी वासुदेव ...

  • राजुरा तालुका खैरे कुणबी समाज मंडळाचा पुढाकार

आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा पाचगाव येथील निवासी वासुदेव मारुती जुनघरे यांचा दिनांक १ जून रोजी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना पत्नी दोन मुली, एक मुलगा आणि वृद्ध वडील आहे. वडीलाच्या अकाली निधनाने पत्नी व लहानग्या मुलाचे छत्र हरपले. जुनघरे कुटुंबियांवर दुःखाचे फार मोठे संकट कोसळले. अशा संकटाच्या काळात आपल्या समाज बांधवांना मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या जाणिवेतून राजुरा तालुका खैरे कुणबी समाज मंडळाच्यावतीने आज दिनांक २७ जून रोजी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मृतक वासुदेव जुनघरे यांच्या तिन्ही पाल्यांना शैक्षणिक साहित्य तथा पुढील शिक्षणाकरता सानुग्रह मदत निधी देण्यात आला. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वासुदेवराव चापले, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, सचिव डॉ.  चौकुंडे सर, विलास चापले, कुणाल कुडे, रामरतन चापले, एडव्होकेट मारोती  कुरवटकर, पाचगाव येथील दशरथ भोयर, शंकर गोणेलवार यासह समाज बांधवांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top