- राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांची बदमानी केल्याचा आरोप
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे आपल्याला दिले, असा दावा पत्रकार परिषदेत करणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यामुळे भाजप व नगरसेवकांची बदनामी झाली, असा आरोप करीत नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी पटोले यांच्याविरुद्ध चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिनांक ८ जून २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे दौऱ्यावर होते. चंद्रपूर शहरांमध्ये असलेल्या बैठकीमध्ये पत्रकारांचा समक्ष बोलत असताना भाजपाचे काही नगरसेवकांनी त्यांची भेट घेतल्याचे व महानगरपालिका चंद्रपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे लेखी निवेदन त्यांना दिल्याचे पत्रकारांसमक्ष सांगितले. तशी बातमी वृत्तपत्रात दिनांक ९ जून रोजी प्रकाशित झाली. या बातमीमध्ये गैरअर्जदार नाना पटोले यांनी भाजपा पक्षाच्या कोणत्याही नगरसेवकाचे नाव उघड केलेले नसून, त्यांचेकडे कोणी लेखी निवेदन दिले आहे व कोणत्या तारखेस दिलेले आहे, हे सुद्धा नमूद केलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये भाजप पक्षाचे सर्वच नगरसेवकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्याकडे संशयाच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात झालेली आहे.
नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी दाखल तक्रारीत म्हटले आहे की, मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य व कार्यकर्ता असून, महानगरपालिका चंद्रपूरमध्ये भानापेठ वॉर्डाचा नगरसेवक आहे. त्यामुळे मला या संपुर्ण परिस्थितीचा सूप मानसिक त्रास व शारीरिक त्रास होत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कधीही भेट घेतलेली नाही. तसे कोणतेही निवेदन कधीही दिलेले नाही. तरीसुद्धा माझ्या पक्षातील वरिष्ठांना तसेच पक्षातील इतर कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेला या बिनबुडाच्या वक्तव्यावरून उत्तरे द्यावी लागत आहेत.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता भाजप पक्षावर व त्यांचे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर व नगरसेवकांची जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत. हा प्रकार जाणीवपूर्वक राजकीय हेतू साध्य करण्याच्या व जनतेची दिशाभूत करण्याच्या वाईट हेतूने, भाजप पक्षाची व नगरसेवकांची बदनामी करणारा आहे, असा आरोप नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी केला आहे. त्यामुळे गैरअर्जदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.