Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र शैक्षणिक प्रगतीत चवथ्या क्रमांकावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पायाभूत सुविधा व डिजिटल लर्नींगमध्ये राज्यात अव्वल मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रगतीमधील कार्य...

  • पायाभूत सुविधा व डिजिटल लर्नींगमध्ये राज्यात अव्वल
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रगतीमधील कार्यक्षमता, प्रतवारी दर्शक अंतरिम  अहवाल  2019-20  नुकताच घोषित करण्यात आला आहे. यात चंद्रपूर जिल्हाने संपूर्ण राज्यातून चवथ्या क्रमांक पटकावून नागपूर ,अमरावती व नाशिकसारख्या जिल्ह्यांना  मागे टाकले  आहे. याशिवाय  डीजीटल अध्ययन व शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण या मूल्यमापन घटक विषयांत मुबंई, सातारा व नाशिक या राज्यातील अव्वल तीन जिल्ह्यांना मागे टाकत राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान चंद्रपूर जिल्हयाने पटकाविला आहे .

शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, शाळांच्या दर्जाचे मूल्यमापन व्हावे व विद्यार्थ्यांची आकलनक्षमता उंचवावी हा, या दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या अहवाल कार्यक्रमामागील उद्देश आहे. या कार्यक्षमता प्रतवारी दर्शक अहवालासाठी स्त्रोतमाध्यम म्हणून  न्यास, यू -डायस, मिड-डे-मिल (मध्यान्ह भोजन योजना), शगुन, शाळासिद्धी, डायट व एनसीईआरटी आदी विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या अहवालात एकूण सहा मूल्यमापनाचे घटक कार्यक्षेत्र विचारात घेतले जात असून त्यात अध्ययन, निष्पत्ती वर्ग, आंतरक्रिया, पायाभूत सुविधा व विद्यार्थी हक्क, शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण, डीजीटल अध्ययन आणि शासकीय प्रक्रिया यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याशिवाय या अहवालात एकूण  83 मानके असून एकूण भारांश सहाशे दिलेला आहे .

चंद्रपूर जिल्याच्या नेत्रदीपक यशामागे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले यांची प्रेरणा व मार्गदर्शन, डायटचे प्राचार्य धनंजय चाफले व प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे यांचे नियोजन व मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच जिल्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विषयतज्ज्ञ, समावेशीत शिक्षणतज्ज्ञ, केंद्रप्रमुख यांचा सातत्यपूर्ण प्रयास, अनुभव व पाठपुरावाच्या माध्यमातून जिल्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने अथक परिश्रमातून हे उल्लेखनीय यश संपादित  केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top