Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्ह्यात 297 कोरोनामुक्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
122 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - गत 24 तासात जिल्ह्यात 297 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग...

  • 122 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
गत 24 तासात जिल्ह्यात 297 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 122 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

बाधित आलेल्या 122 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 28, चंद्रपूर तालुका 7, बल्लारपूर 21, भद्रावती 9, ब्रम्हपुरी 2 , नागभिड 10, सिंदेवाही 4, मूल 8, सावली 6, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 6, राजूरा 2, चिमूर 3, वरोरा 6, कोरपना 5, जिवती 2 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.  आज मृत झालेल्यांमध्ये मुल तालुक्यातील हळदी येथील 65 वर्षीय महिला तर गडचिरोली जिल्ह्यातील गोकुल नगर वार्ड येथील 65 वर्षीय महिलेचा  समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 877 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 81 हजार 119 झाली आहे. सध्या 1 हजार 270 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 2 हजार 573 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 15 हजार 749 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1488 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1377, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 40, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top