- राजुरा तालुक्यातील टेम्बुरवाही येथील घटना
विरूर स्टेशन -
राजुरा तालुक्यातील टेम्बुरवाही येथे आपल्या आजोबांकडे राहत असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 27 जूनला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. मृतक युवतीचे नांव दीपाली बाबुराव मरापे असे आहे.
मृतक युवती ही उपरवाही येथील असून ही लहानपणापासूनच आपल्या आजोबा उद्धव लचमा कुळसंगे रा. टेम्बुरवाही येथे राहत होती घटनेच्या दिवशी घरातील सर्व सदस्य शेतात गेले असता दुपारच्या सुमारास घरात असलेल्या पाळणा च्या दोराने गडफास घेऊन आत्महत्या केली.
सदर घटनेची गावकऱ्यांना माहिती होताच गावातील पोलीस पाटील यांनी विरुर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. तात्काळ ठाणेदार कृष्णकुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वडतकर, मडावी, धनपालसिंग हे घटनास्थळी पोहचले व घटनेचा पंचनामा करून मृत्युदेह उत्तरिय तपासणीसाठी राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. बातमी लिहे पर्यंत आत्महत्या चे मूळ कारण कळू शकले नाही.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.