Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आदिवासींना मंजूर दोन हजार रुपयांचा किराणा त्वरित द्यावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकरी संघटनेची मागणी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राज्य शासनाने खावटी अनुदान योजने अंतर्गत मंजूर केलेल्या दोन हजार रुपये किमतीच्...

  • शेतकरी संघटनेची मागणी

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -

राज्य शासनाने खावटी अनुदान योजने अंतर्गत मंजूर केलेल्या दोन हजार रुपये किमतीच्या किराण्याचे अनुसूचित जमातीच्या आदिवासी कुटुंबांना तात्काळ वाटप करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे आदिवासी विकास मंत्री, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग व आदिवासी आयुक्त यांचेकडे मेल द्वारे केली आहे. 

महाराष्ट्र शासनाने आर्थिक वर्ष 2020-21 या काळाकरिता अनुसूचित जमातीच्या, आदिवासींच्या कुटुंबांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत चार हजार रुपये प्रति कुटुंब मंजूर केले असून यापैकी दोन हजार रुपये रोखीने आदिवासी कुटुंबांचे खात्यात जमा झालेले आहे. परंतु अजून पर्यंत आदिवासी कुटुंबांना मंजूर केलेला दोन हजार रुपयांचा किराणा प्रत्येक कुटुंबा पर्यंत आदिवासी विभागामार्फत किंवा आदिवासी विकास महामंडळा मार्फत वितरित करण्यात आलेला नाही. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात रोजगार, कारोबार, व्यवसाय सर्व बंद असल्यामुळे आदिवासी कुटुंबे प्रचंड आर्थिक अडचणीत असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

करिता या बाबीला प्राधान्यक्रम देऊन आदिवासी विकास विभागाने व आदिवासी विकास महामंडळाने किराणा व गृहपयोगी सामानाचे तातडीने वाटप करावे आणि आदिवासी कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्याचे आदिवासी विकासमंत्री, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव व आदिवासी विकास आयुक्त यांचेकडे शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप,जिल्हाप्रमुख अरुण नवले, अँड.श्रीनिवास मुसळे, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, पोर्णिमा निरांजने, नीळकंठ कोरांगे, अँड.शरद कारेकर, तुकेश वानोडे, प्रा.निळकंठ गौरकर, प्रा. रामभाऊ पारखी, सुधीर सातपुते, रघुनाथ सहारे, दादा नवलाखे, डॉ.संजय लोहे, बालाजी पवार,दिनकर डोहे, पि.यू. बोंडे यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top