चंद्रपूर -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लावण्यात आलेल्या ब्रेक द चैनमुळे मागील दोन महिन्यापासून जिल्ह्यातील व्यापार धंदे बंद आहेत. व्यापाऱ्यांनी शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन केले. नुकतेच शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार 10 टक्क्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्याना शिथीलतेतून वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून त्यासंदर्भात आज मंगळवार, 1 जून रोजी जिल्ह्यातील काही प्रमुख व्यापारी संगठनेच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या रामू तिवारी यांनी पालकमंत्र्यांशी ऑनलाइन चर्चा घडवून आणली. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याशी वीडियो कॉल वर ऑनलाइन चर्चा केली पालकमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने खोलण्यासाठी सुट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे दारूबंदी हटवल्या बद्दल अभिनंदन करत आमच्याही पोटापाण्याकडे लक्ष द्या म्हणत पालकमंत्रांचे या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले. व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय पालकमंत्री घेणार अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी रामकिशोर सारडा, रामजीवन परमार, दिनेश बजाज, सुमेध कोतपल्लीवार, नरेंद्र सोनी, संदीप माहेश्वरी, पंकज शर्मा, दिनेश नथवानी, राकेश टहलियानी, चिराग नथवानी, नरेश मोटवानी, मनीष राजा, अजय सागलानी आदि व्यापारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.